आमची टीम
संस्थापक अॅड. अनिकेत उज्ज्वल निकम आणि जळगावमधील सात वकील मिळून आमची टीम काम करते. शिबिरांमध्ये लोकांच्या अडचणी समजून घेणे, कागदपत्रे पाहणे, योग्य मार्गदर्शन करणे आणि गरज भासल्यास पुढील कायदेशीर प्रक्रियेत मदत करणे - हे काम ते नियमितपणे करतात.
संस्थापक

अॅड. अनिकेत उज्ज्वल निकम
संस्थापक, न्याय विश्वास फाउंडेशन
अनिकेत यांचे बालपण जळगावात गेले. गेली दहा वर्षांहून अधिक काळ ते वकिली करत असून, त्यांनी मुंबईतून बी.एल.एस. आणि न्यूयॉर्क विद्यापीठातून एलएल.एम. पूर्ण केले आहे. ते मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात वकिली करतात.
त्यांच्या व्यावसायिक कामात प्रामुख्याने फौजदारी प्रकरणे, जामीन अर्ज आणि आर्थिक गुन्ह्यांशी संबंधित प्रकरणांचा समावेश आहे. वकिली करताना त्यांना वारंवार असे लोक भेटले, ज्यांच्याकडे कायदेशीर पर्याय उपलब्ध होते; पण नेमके कुठे जावे, कोणाशी बोलावे किंवा सुरुवात कशी करावी, हेच त्यांना माहीत नव्हते. याच अनुभवातून न्याय विश्वास फाउंडेशनची कल्पना पुढे आली.
न्याय विश्वास फाउंडेशन ही स्वतंत्र ना-नफा संस्था आहे. ॲड. अनिकेत निकम यांची वैयक्तिक वकिली आणि फाउंडेशनचे काम स्वतंत्रपणे चालते.
वकिलांचे पॅनेल

अॅड. हर्षल एस. पाटील
जिल्हा व सत्र न्यायालय, जळगाव येथे वकिली करतात.

अॅड. विजय नारायणसिंह राजपूत
जिल्हा व सत्र न्यायालय, जळगाव येथील वकील.

अॅड. संभाजी रघो जाधव
1985 पासून वकिली करत आहेत. अतिरिक्त सरकारी वकील आणि सहायक शासकीय अभिवक्ता (2019-2020).

अॅड. संदीप गोकुळ पाटील
कौटुंबिक न्यायालय, फौजदारी न्यायालय आणि भूसंपादन न्यायाधिकरणाशी संबंधित प्रकरणे हाताळतात.

अॅड. पृथ्वीराज संभाजी जाधव
2023 पासून उच्च न्यायालय आणि जिल्हा न्यायालयात वकिली करतात.

अॅड. अभिलाषा धनंजय पवार
वकील.

अॅड. शिवराज अनंता दुबेले
वकील.
